तुम्हाला माहितीये का शिवसेनेतील फुटीची इनसाइड स्टोरी, वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपले शासकीय निवासस्थान सोडले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपले शासकीय निवासस्थान सोडले. आपल्या पक्षाचा एकही आमदार आपल्या विरोधात असेल तर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, अशी घोषणा स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हमध्ये केली होती. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' सोडण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. (maharashtra political crisis how power shifted from uddhav thackeray to eknath shinde devendra fadnavis)

दरम्यान, एकनाथ शिंदे बुधवारी त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले, तेव्हा उद्धव ठाकरेही त्याच रात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर जातील, याची कुणालाही कल्पना नव्हती. स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा सैनिक म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे म्हणाले की, 'शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली आहे.' महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात अखेर वादळ कधी उठलं? यामागे फक्त भाजप (BJP) आहे का? की कालांतराने ठाकरे कुटुंबाची शिवसेनेवरील पकड कमकुवत झाली आहे? चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळाची इनसाइड कहाणी...

Uddhav Thackeray
माझं अपहरण झालं होतं; शिवसेना आमदाराने केला दावा

उद्धव ठाकरे कुठे चुकले?

अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शरद पवारांच्या साथीने भाजपला राजकीय मात दिली. परंतु यावेळी परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांचे कुठे चुकले या प्रश्नावर जेएनयूचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक डॉ मनीष दाभाडे म्हणाले की, "उद्धव ठाकरे काळाप्रमाणे बदलले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या आमदारांची एक मोठी तक्रार आहे की, कोणत्याही प्रकारचा पक्षीय निर्णय घेताना त्यांना विचारात घेतले जात नाही. त्याचबरोबर त्यांनी मांडलेल्या समस्याही व्यवस्थित सुटत नाहीत.'' मात्र, बुधवारी फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आधी कोविडमुळे आणि नंतर शस्त्रक्रियेमुळे काही अडचण आली.' मात्र त्यांच्या स्पष्टीकरणाशी किती आमदार सहमत होतील, हा मोठा प्रश्न आहे.

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद महागात पडला?

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. नवीन सरकार स्थापनेवेळी शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असे मानले जात होते. त्यामुळेच युतीबाबत मतभेद होऊनही शिंदे यांच्या बंडखोर गटाने विरोध केला नाही. मात्र अखेरच्या क्षणी शरद पवारांनी शिंदे यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. तेव्हापासून शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊन आदित्य ठाकरे सतत पक्षातले निर्णय घेत असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होती. आणि या सगळ्यात त्यांना संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांची साथ मिळत होती. याचा बराच काळ शिंदे यांना त्रास होत होता. एमएलसी निवडणुकीदरम्यानही काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेते पदावरून हकालपट्टी

याची काळजी बंडखोर आमदारांना!

गुवाहाटी हॉटेलमध्ये विश्रांती घेणारे बहुतांश आमदार हे मुंबईबाहेरच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून आलेले आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून येणाऱ्या आमदारांना आपल्याला पुढील निवडणूक लढवता येणार नसल्याची भीती सतावत आहे. कारण बहुतांश आमदार काँग्रेस (Congress) किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात विजयी झाले आहेत. अशा स्थितीत भाजपच्या मदतीशिवाय या भागात शिवसेनेच्या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही.

शिंदे आणि फडणवीस यांच्या जुगलबंदीने बदलले समीकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांना मोकळा हात मिळाला. फडणवीस यांनी त्यांच्या कारभारात कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यावेळी अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्येही शिंदे यांचा सहभाग असायचा. सध्याच्या सरकारमध्येही जेव्हा-जेव्हा विरोधकांना सरकारच्या बाजूने बोलायचे होते तेव्हा तेच शिंदे फडणवीसांना भेटायचे. आधी राज्यसभा आणि नंतर एमएलसी निवडणुकीत फडणवीस यांनी शिंदे यांच्या माध्यमातून पराभवाची पलटवार केल्याचे बोलले जात आहे. आता पुन्हा या जोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे.

Uddhav Thackeray
शिवसेना खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

त्यामुळे ठाकरेंचे सरकार पडणार का?

या संपूर्ण राजकीय घटनाक्रमावर भाजपने मौन बाळगले आहे. अजित पवार प्रकरणापासून राज्यात भाजप अत्यंत सावधपणे पुढे जात आहे. सध्या शिवसेनेचे 37 आमदार शिंदे यांच्याकडे येईपर्यंत भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. कारण यापेक्षा कमी संख्या असेल तर पक्षांतर विरोधी कायदा लागू होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com