Mahavikas Aghadi Morcha: अजित दादा संतापले, फडणवीसांच्या टीकेला पवारांचे प्रत्युत्तर

महाविकास आघाडीच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जहरी टीका केली होती.
Ajit Pawar |Maharashtra Politics | Maha Morch | Mahavikas Aghadi Maha Morch | Mahavikas Aghadi Morch
Ajit Pawar |Maharashtra Politics | Maha Morch | Mahavikas Aghadi Maha Morch | Mahavikas Aghadi MorchDainik Gomantak

Mahavikas Aghadi Maha Morch: राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चावर फडणवीसांनी टीका केली होती. फडणवीसांनी कालच्या मोर्चाला नॅनो मोर्चा असे म्हटले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना विचारले असता, आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाला नॅनो म्हणावे की स्कुटर म्हणावे हा त्यांचा विषय असल्याचे अजित पवार म्हणाले.

कारण नसताना बदनामी

शनिवारी म्हणजेच 17 डिसेंबरला मुंबईमध्ये (Mumbai) महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. हा नॅनो मोर्चा असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले.

मी शेवटपर्यंत मोर्चात सहभागी झालो होतो. या मोर्चात (Maha Morcha) पैसे वाटप झाले नाहीत. कारण नसताना बदनामी होत असल्याचे अजित पवार म्हणाले. बेताल वक्तव्याच्या विरोधात जनतेने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत लोक मोर्चात सहभगी झाले होते. महाविकास आघाडीसाठी आम्ही एकत्र येत असतोच. पण मोर्च्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, त्यामुळे समाधानी असल्याचे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar |Maharashtra Politics | Maha Morch | Mahavikas Aghadi Maha Morch | Mahavikas Aghadi Morch
Maharashtra: महाविकास आघाडीच्या मोर्चावर विरोधकांची टीका
  • काय म्हणाले होते फडणवीस?

महा मोर्चाचे जे व्हिडिओ (Video) बाहेर येत आहेत, ते लाजिरवाणे आहेत. मोर्चात आलेल्या लोकांना आपण का आलो हे माहीत नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. कोणत्या पक्षाचा मोर्चा आहे हे माहित नाही. पैसे वाटले जात आहेत आणि एवढे सगळे करूनही ते संख्या जमवू शकले नाहीत. त्यामुळे जनतेला काय हवे आहे हे आज दिसून आले आहे. जनतेलाही माहित आहे की हे फक्त राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहे. मुंबईत नॅनो मोर्चा निघाला त्यामुळे त्यांनी ड्रोनचे शुट देखील दाखवले नाही. त्यामुळे मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com