शिवसेनेला मोठा धक्का! आमदारांपाठोपाठ 4 मंत्री नॉट रिचेबल

एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत.
शिवसेनेला मोठा धक्का! आमदारांपाठोपाठ 4 मंत्री नॉट रिचेबल
Eknath Shinde Dainik Gomantak

विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात घडामोडींना मोठा वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तातडीने बैठक बोलावली असून मतदान करून माघारी निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलवण्यात आलं आहे. तसेच संजय राऊत यांनी तत्काळ दिल्ली दौरा रद्द केला आहे. (Maharashtra Politics Eknath Shinde is in Surat with 4 ministers and 12 MLAs)

Eknath Shinde
अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी करुणा शर्मा यांना अटक

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून मुक्काम हालवला असून त्यांनी गुजरातमध्ये आश्रय घेतला असल्याचे समोर आले आहे. ते आज पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समोर आल आहे. यातच आता किरीट सोमय्यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे तर उद्धव ठाकरे यांचे बारा वाजणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.

यामुळे शिवसेनेमध्ये (shivsena) मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे हे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे शिवसेना फुटली असल्याची चर्चा रंगली यामुळे सरकार धोक्यात आले आहे. त्यानंतर अनेक सेनेचे आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर येत आले.

त्यातच आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे आणि एवढंच नाहीतर अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.

Eknath Shinde
रोडवर गोंधळ! मद्यधुंद अवस्थेत महिलेने पोलिसाला मारल्या लाथा Video

एकूण चार मंत्री नॉट रिचेबल असल्याचे समोर येत आहे. उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे देखील नॉट रिचेबल आहेत. आमदार चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते, तर चौगुले यांचे दोन्ही नंबर सध्या बंद आहे. तसेच बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्हींही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये कोकणमधील 2 आमदार आहेत. तर ठाण्यातील 2 आमदारही सोबत असल्याचे समोर आले आहे. तर नांदेड जिल्ह्यातील उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा फोन बंद लागत आहे. बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदेंसोबत असल्याची चर्चा रंगत आहे.

स्वीय सहाय्यकाचे फोनही बंद असल्यामुळे चर्चेला उधाण आले. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहेत तर आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com