Maharashtra: एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब- सूत्र
STDainik Gomantak

Maharashtra: एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब- सूत्र

मात्र अखेर एसटी. महामंडळाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाला आहे.

महाराष्ट्रातील राजकारण एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन चांगलच गाजत असताना आता उध्दव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray government) एसटी. महामंडळाच्या शिक्कामोर्तब करणार असल्याचे मागील काही दिवसापासून सांगण्यात येत होते. मात्र अखेर एसटी. महामंडळाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाला आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी. संपावर अद्याप कोणत्याही स्वरुपाचा तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात या संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार आहे. अखेर राज्याच्या परिवहन विभागाकडून खासगीकरणाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

ST
'कंगना तर नाचणारी', मंत्री विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली

दरम्यान, मुंबई सेंट्रल कार्यालयामधील बैठकीदरम्यान एकमताने निर्णय झाला असलयाची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचे खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये शटल गाड्यांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. मात्र खासगीकरणामुळे एसटीच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवनेरी आणि शिवशाही गाड्या चालविणाऱ्या कंपन्यांचांच येत्या काळात खासगीकरणासाठी परिवहन विभागाकडून विचार करण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. येत्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास कंपन्यांना राज्य परिवहन विभाग निमंत्रण देणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com