'MPSC' परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जानेवारी 2021

कोरोना आणि मराठा आरक्षण स्थगितीमुळे पुढे ढकललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

सोलापूर : कोरोना आणि मराठा आरक्षण स्थगितीमुळे पुढे ढकललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार राज्य सेवेची पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार आहे. ’एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळणार असून, आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना ’ईडब्ल्यूएस’मधून संधी दिली जाणार आहे. त्यांना १५ जानेवारीपर्यंत सुधारित अर्ज भरुन देता येणार आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने आयोगाने राज्य सरकारच्या आदेशानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 

संबंधित बातम्या