महाराष्ट्रात कोरोनाचा आलेख वाढताच; आज आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक नवे रुग्ण 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 7 एप्रिल 2021

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरी उतरतील लागल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा देशात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरी उतरतील लागल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा देशात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, केरळ आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ही परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असल्याचे समोर येत आहे. कारण मागील चोवीस तासात देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ,महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल 59,907 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. (Maharashtra records highest daily count of new coronavirus cases)

लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि महाराष्ट्राची चांगलीच जुंपली

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र्र सरकारने राज्यात पावले उचलत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर देखील महाराष्ट्रातील नवीन कोरोना बाधितांची रुग्णवाढ थांबता थांबेना असे दिसत आहे. कारण एकाच दिवसात महाराष्ट्रात 59,907 नवीन कोरोना बाधित आढळले असून 322 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी 31,73,261 वर पोहचली आहे. 

सचिन वाझे यांचा अनिल देशमुखांवर आणखी एक लेटर बॉम्ब

तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,01,559 वर पोहोचल्याचे समजते. तर, आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांची संख्या 56,652 झाली आहे. याशिवाय, मागील चोवीस तासात 30,296 जण महाराष्ट्रात कोरोनाच्या विळख्यातून पुन्हा व्यवस्थित बाहेर पडले आहेत. आणि आतापर्यंत 26,13,627 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

दरम्यान, नुकतेच महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाचा (Corona) प्रभाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रात विकेंड लॉकडाउन करण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्रात शुक्रवारी आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे. तर अन्य दिवशी रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. शिवाय अन्य दिवशी दिवसभर जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.            

संबंधित बातम्या