Amit Shah Mumbai Tour: गृहमंत्री शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सूरक्षा यत्रंणेचे दूर्लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त असतानाही मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे.
Amit Shah Mumbai Tour
Amit Shah Mumbai TourDainik Gomantak

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव असल्याचे सांगत एका व्यक्ती काही तास अमित शाह (Amit Shah) यांच्याभोवती वावरत होता. या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हेमंत पवार असे या आरोपीचे नाव आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव (Ganesh Festival) मंडळातील गणरायाचे दर्शन घेतले होते.

अमित शाह यांच्या सुरक्षितेसाठी कडक बदोबस्त करण्यात आला होता. मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचेही शाह यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेतली होती. पण या दरम्यान एक व्यक्ती शाह यांच्या भोवती वावरत होती. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे स्वीय सचिव असल्याचे त्याने सांगितले होते. पण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.

Amit Shah Mumbai Tour
महाराष्ट्रातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 13 ऑक्टोबरला मतदान

मुंबई पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेउन त्याची चौकशी केली. आरोपीचे नाव हेमंत पवार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी पवार याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठा कडेकोट बंदोबस्त असताना दुसरीकडे संशयास्पद व्यक्तीचा वावर कसा काय राहिला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी ही सुरक्षेत चूक नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांची ही सतर्कता होती. त्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. या आरोपीची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

फसवणूक करण्याचा हेतू?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपी हेमंत पवार हा केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवत होता. गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री आॅफ होम अफेर्स असे नामनिर्देष असलेली निळ्या रंगाची आयकार्ड सोबत असणारी रिबीन लावून शासकीय अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती.

शाह यांच्याभोवती वावरणारा हेमंत पवार हा लोकांची फसवणूक करत होता का, याचाही तपास सुरू आहे. अमित शाह किंवा इतर नेत्यांसोबत मोठी ओळख असल्याचे सांगून तो फसवणूक करत होता का, त्याने आतापर्यंत कितीजणांना गंडा घातला, याचाही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com