Maharashtra SSC Result 2022: दहावीच्या निकालात मुलींची बाजी, एकूण निकाल 96.94 टक्के

Maharashtra SSC 10th Result 2022: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
Maharashtra SSC Result 2022
Maharashtra SSC Result 2022 Dainik Gomantak

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात 96.94 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का 97.96आहे. 2020 च्या तुलनेत निकालात तब्बल 1.64 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra ssc 10th result 2022 News)

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची (SSC) परीक्षा घेण्यात आली होती.

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.27 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक 95.90 टक्के विभागाचा लागला आहे. एकूण 15,68,977 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15,21,003 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल कुठे पाहाल

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

ऑनलाइन निकाल कसा पाहाल?

http://ssc.mahresults.org.in वर जावे
दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com