महाराष्ट्रात एका दिवसात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट

मुंबईत सर्वाधिक 7000 नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateDainik Gomantak

राज्य आणि केंद्र शासन काही दिवसांपूर्वी मंकिपॉक्सपासून बचावासाठी ध्येय - धोरणे ठरवत होते. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसात देश आणि राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन आता कोरोनाच्या दृष्टीने यंत्रणा सक्रीय करण्यात गुंतले आहेत. त्यामूळे आता कोरोना फैलावास अटकाव हाच केंद्र आणि राज्यस्तरावरील महत्त्वाचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क रहावे लागणार आहे. (Maharashtra, the number of corona patients has doubled in one day )

कोरोना रुग्णांचा आकडा आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्याच तब्बल 2 हजार 701 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे. कारण आज राज्यात 2701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1327 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update
खेलो इंडिया गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबईत सर्वाधिक 7000 नव्या रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 9806 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7000 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1482 इतके सक्रिय रुग्ण आढळतात.

Maharashtra Corona Update
धक्कादायक: हळदी समारंभात आलेल्या आदिवासी महिलेला ठरवले चेटकीण

देशात मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात पाच हजार 233 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 28 हजार 857 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com