महाराष्ट्राला केंद्र सरकाडून मिळणार 1 कोटी 92 लाख लसी!

शिवाय महाराष्ट्राची (Maharashtra) गरज लक्षात घेता आणखी एक कोटी लसींच्या मात्रा देण्याची मागणी केली आहे.
Vaccine
VaccineDainik Gomantak

देशात कोरोनाचा (Covid 19) संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. यातच आता महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना लसीकरणाची (Vaccination) गरज लक्षात घेता मोदी सरकारकडून (Modi Government) सप्टेंबर महिन्यासाठी महाराष्ट्राला तब्बल 1 कोटी 92 लाख लसींची मात्रा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 1कोटी 70 लाख कोरोना लसीच्या मात्रा राज्याला तर 22 लाख लस (Vaccine) मात्र खासगी रुग्णालयांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जादा लसींचा पुरवठा केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास (Dr. Pradip Vyas) यांनी केंद्रीय सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांना पत्र पाठवून त्यासंबंधी आभार मानले आहेत. शिवाय महाराष्ट्राची गरज लक्षात घेता आणखी एक कोटी लसींच्या मात्रा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गुजरात (Gujarat) आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) तुलनेत महाराष्ट्राला सुरुवातीपासून केंद्र सरकारकडून कमी कोरोना लसींचा पुरवठा होत असून राज्याची लोकसंख्या त्याचबरोबर वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता किमान तीन कोटी लसींची मात्र मिळाव्या अशी मागणी ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) केंद्रसरकारकडे करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ऑगस्ट महिन्यामध्ये एक कोटी 20 लाख लसींच्या मात्रा दिल्या जातील असे मोदी सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्याचवेळीही त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राकडे अडीच कोटी लसींच्या मात्रा देण्याची मागणी केली होती.

Vaccine
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याच्या lockdown model ची थेट कोलंबियात दखल

ही मागणी करताना राज्यातील वाढती कोरोना परिस्थिती त्याचबरोबर लसीकरणाची क्षमता यासंबंधीची माहिती केंद्र सरकारकडे देण्यात आली होती. राज्यात तब्बल साडेचार हजार लसीकरणाची केंद्रे असून त्या माध्यमातून रोज सुमारे 15 ते 20 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे मात्र केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात कोरोना लसींची मात्रा मिळत नसल्याने अनेक वेळा निम्मी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती. मात्र मागील दहा दिवसांपासून म्हणजे 21 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारकडून पुरेशा लसींचा पुरवठा झाल्यामुळे दैंनदिंन सरासरी साडेनऊ लाख लसींची मात्रा एवढे लसीकरण होत होते.

Vaccine
धोका वाढला! महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग

शिवाय, कोरोनाची तिसरी लाट येण्याआगोदर जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यावर आरोग् विभागाचा आहे. आत्तापर्यंत राज्यातील पाच कोटी 90 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून यामध्ये लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या तब्बल एक कोटी 59 लाख एवढी आहे. अजूनही मोठ्या संख्येने कोविड योध्द्यांचे आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांची लसीचा दुसरा डोस घेण्याचे शिल्लक आहेत. तात्काळ त्यांचेही लसीकरण बाकी असून केंद्र सरकारकडून अतिरिक्त एक कोटी कोरोना लसींची मात्र मिळाल्यास राज्यातील लसीकरणाला आणखी गती देता येईल असेही आरोग्य विभागाच्या एका जेष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com