महाराष्ट्र हळहळला ! नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकच्या लिकेजमुळे 22 जणांचा मृत्यू 

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगवण्याच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंकमध्ये झालेल्या लिकेजमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.  राज्यात कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, बेड अभावी प्रचंड हाल होत आहेत. ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगवण्याच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंकमध्ये झालेल्या लिकेजमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सुरज मांढरे यांनी म्हटले आहे. चिंताजनक बाब म्हणजे या घटनेत अजून काही रुग्ण दगावण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र, ऑक्सिजन लोकेजची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने काही रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. (Maharashtra is in turmoil! 22 killed in oxygen tank leak in Nashik) 

''कदाचित ही शेवटची गुड मॉर्निंग" म्हणत डॉक्टर महिलेने सोडले प्राण

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ही घटना घडली आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना हे लिकेज झाल्यामुळे ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाले. यावेळी रुग्णालयात २३ रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. मात्र यातील 22 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. ही दुर्घटनेवेळी 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

दरम्यान,  टॅंकमधील लिकेजची माहिती मिळताच लिकेज रोखण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी बचाव पथक काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र, लिकेज दुरुस्तीपर्यंत रुग्णालयातील  व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ऑक्सिजन टॅंककहा व्हॉल्व लिकेज झाला आणि ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांना मिळणार ऑक्सीजन्चा पुरवठा खंडित झाला, ज्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक प्रशानसनाकडून मिळाली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. 

संबंधित बातम्या