Maharashtra Lockdown: 14 जिल्हे होणार लवकरच अनलॉक!

कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच राज्यातील व्यापारालाही आता हळूहळू गती मिळावी , यासाठी हा निर्णय घेतला जावा(Maharashtra Lockdown)
Maharashtra Lockdown: 14 जिल्हे होणार लवकरच अनलॉक!
Maharashtra Unlock: 14 districts soon to be free, reportsDainik Gomantak

राज्यात आलेली दुसरी कोरोना(COVID-19) लाट पाहता सरकारने(Maharashtra Government) लॉकडाऊनसह(Maharashtra Lockdown) अनेक निर्बंध राज्यासाठी घातले होते कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकार सतत निर्बंधांमध्ये वाढ करत गेले पण मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशातच आता राज्यात लागू असलेले लॉकडाऊनसह इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्णदर 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः उठवणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात एकूण 14 जिल्हे या यादीत असणार आहेत जिथे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत आणि त्या संबंधित जिल्ह्यांची यादी आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असल्याचीही माहिती मिळत आहे. (Maharashtra Unlock: 14 districts soon to be free, reports)

Maharashtra Unlock: 14 districts soon to be free, reports
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सलग तीन आठवड्यांपासून 1 टक्क्यांच्या खाली आले आहे अशा जिल्ह्यांना हा दिलासा मिळणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच राज्यातील व्यापारालाही आता हळूहळू गती मिळावी , यासाठी हा निर्णय घेतला जावा, असा दावा आरोग्य मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित केली जाईल आणि ती जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात सध्या लसीकरणावर जोरदार भर दिला जात आहे. आतापर्यंत 4 कोटींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले असून 1 कोटींपेक्षा अधिक लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार एकूण 70 टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे आणि सरकार आता त्याच दिशेने पाऊल टाकत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com