कोरोनाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Maharashtras big demand from the central government against the backdrop of Corona
Maharashtras big demand from the central government against the backdrop of Corona

देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. रोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत असताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील कोणत्याही भागामध्ये कोरोना लसीचा तुटवडा  कमी  पडणार नसल्याची माहीती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. केंद्र सरकार राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या गरजेनुसार लसींचा पुरवठा करत असल्याचंही ते म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राला लसींचा पुरवठा योग्य वेळेत न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 11 राज्यांतील आरोग्यमंत्र्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन, त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यापुढे ही टोपे म्हणाले, राज्य़ात 12 मेट्रीक टन ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे, त्यापैकी 7 टन पेक्षा अधिक ऑक्सिजन प्रतिदिवस खर्च होत आहे. (Maharashtras big demand from the central government against the backdrop of Corona)

लसीकरणामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा मार्ग आहे. लसीकरण हे मोफत आणि सुरक्षित होत आहे, मात्र कोरोनाची लस उपलब्ध होत नाही हा मोठा प्रश्न आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी आम्ही वेगवेगळी टेक्नॉलॉजी विकसीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मंगळवारी आम्ही नव्या तंत्रज्ञानाविषयी माहीती घेतली असून हवेमधील ऑक्सीजन एकत्रीत केला जाऊ शकतो असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे लिक्विफाइड आणि प्रेशराइज्ड ऑक्सिजनची आवश्यकता कमी होईल. राज्यसरकार मुंबई, पालघर आणि इतर ठिकाणीसुध्दा प्रस्तावीत ऑक्सिजन प्लांट लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले आहे.  


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com