महिला व बाल अत्याचाराविरोधात फाशीची तरतूद असलेल्या कायद्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून मंजूरी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने काल बलात्कार, बाल अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या दोन विधेयकांना मान्यता दिली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने काल बलात्कार, बाल अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या दोन विधेयकांना मान्यता दिली. यात बलात्कार, बाल शोषण आणि अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

 

या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविण्यात आले असून यात नवीन गुन्ह्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे .यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे, समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे,बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत लागू करणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

काल झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट २०२० आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ २०२० अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील, असेही निश्चित करण्यात आले आहे.

 

अधिक वाचा :

चिखलीत रात्री अचानक झालेल्या वायूगळतीमुळे भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या