महाविकास आघाडीत महामंडळ व देवसंस्थान वाटपावर अखेर एकमत ?

महाविकास आघाडीत महामंडळ व देवसंस्थान वाटपावर अखेर एकमत ?
Pandharpur-Shirdi

महाराष्ट्र - महाविकस आघाडीमधील शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आणि काँग्रेस (Congress) नेत्यांची राज्यातील महामंडळ वाटपाबाबत बैठक पर पडली. या बैठकीत महामंडळ वाटपाचे सूत्र ठरविल्याचे सांगितले आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा देवस्थान हे सर्वात श्रीमंत मानले जाते. हे देवसंस्थान राष्ट्रवादीकडे , तर पंढरपूरमधील  विठ्ठल - रुक्मिणी देवसंस्थांना हे  काँग्रेसला मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संस्थांनावर काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आला होता. परंतु , प्रत्येकी एक संस्थान काँग्रेस तसेच राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. (Mahavikas Aghadi Mahamandal and Dev  Sansthan finally agreed)

दरम्यान , शिर्डी येथील साईबाबा देवस्थान आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होते. काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात देखील साईबाबा देवस्थानवर काँग्रेस या पक्षाचाच ताबा होता. परंतु, यावर्षी पहिल्यांदाच साईबाबा देवस्थान राष्ट्रवादीकडे आले आहे. राष्ट्रवादीमधून अध्यक्षपदावर आमदार आशुतोष काळे यांची निवड पक्की आहे. 

तसेच पंढरपूरमधील विठ्ठल - रुक्मिणी देवस्थान काँग्रेस पक्षाकडे गेले आहे. या ठिकाणी पक्षाकडून कोणला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. मुंबई शहरातील सिद्धीविनायक मंदिर शिवसेनेकडे आहे. भाजप सरकारच्या कार्यकिर्दीत देखील हे मंदिर शिवसेनेकडेच होते. यामुळेच नव्या सरकारमध्ये देखील हे मंदिर शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. सिडको काँग्रेसकडे, ‘म्हाडा’ शिवसेनेकडे आणि महिला आयोग ‘राष्ट्रवादी’ला देण्यावर सहमती झाली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com