महविकासआघाडीचा महाराष्ट्र्र बंद! भाजप मनसेचा मात्र विरोध

लखीमपूर खैरी हिंसाचाराच्या निषेधार्थ मह विकासआघाडीने आज 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Bandh) ची हाक दिली आहे.
Mahavikasaghadi called Maharashtra Bandh to support Lakhimpur Kheri incidence aap92
Mahavikasaghadi called Maharashtra Bandh to support Lakhimpur Kheri incidence aap92Twitter @ ANI

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खैरी (Lakhimpur Kheri) हिंसाचाराच्या निषेधार्थ मह विकासआघाडीने (Mahavikasaghadi) आज 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Band) ची हाक दिली आहे.मात्र या महाराष्ट्र बंदला पुणे-मुंबई-ठाण्याच्या व्यापाऱ्यांनी रविवारी दुपारपर्यंत विरोध केला होता.आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यावर बोलताना मुंबई व्यापारी संघटनेचे वीरेन शहा यांनी,' आम्ही शेतकऱ्यांची दुर्दशा समज शकतो, त्यांना पाठिंबाही देतो, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. पण व्यापाऱ्यांना या बंदमध्ये ओढू नये.मात्र पुन्हा संध्याकाळी मुंबई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत दुपारी 4 पर्यंत आम्ही बंद पळत आहोत अशी माहिती दिली आहे. (Mahavikasaghadi called Maharashtra Bandh to support Lakhimpur Kheri incidence aap92)

मुंबईच्या व्यापाऱ्यांनंतर पुण्याच्या व्यापारी संघटनेनेही संध्याकाळपर्यंत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे , पण पुण्याचे किरकोळ व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम आहेत.नागपूर आणि औरंगाबादच्या व्यापारी संघटनेने दुकाने उघडण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान महाविकासआघाडीच्या या बंदला भाजपने विदोध केला आहे,या प्रकरणावर महाविकासआघाडी फक्त राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

तसेच या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विरोध केला आहे, ज्यावेळेस हे शेतकरी बिल लोकसभेत मांडले जात होते तेंव्हा महविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले होते? असा सवाल करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच लोकांना हा बंद नको आहे मात्र पोलीस स्वतः दुकाने बंद करत फिरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Mahavikasaghadi called Maharashtra Bandh to support Lakhimpur Kheri incidence aap92
‘महाराष्ट्र बंद’ रविवारी मध्यरात्रीनंतरच होणार सुरुवात

तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते राजभवनाबाहेर निषेध करण्यासाठी मौन व्रत पाळतील. '[हा बंद यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे' अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान या बंदला सध्यातरी संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com