मेकअप आर्टिस्टला ऑनलाइन 'दारू' खरेदी करणे पडले महागात

फोनवर 1500 रुपयांना वाईनची (wine) बाटली विकत घेण्याचा प्रयत्न करत होता.यातून त्याने 69,700 रुपये पाठवण्याची फसवणूक करण्यात आली.
मेकअप आर्टिस्टला ऑनलाइन 'दारू' खरेदी करणे पडले महागात
WineDainik Gomantak

मुंबईतील कांदिवली (पूर्व) येथील एक मेकअप आर्टिस्ट (Makeup artist) सायबर क्राईमची बळी ठरली आहे. यामध्ये एका वाईन शॉपच्या कर्मचाऱ्याची तोतयागिरी समोर आली आहे. त्याने या मेकअप आर्टिच्या बँक खात्यातून पैसे काढत तिची फसवणूक केली आहे.

एका माध्यमाने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, या 45 वर्षीय तक्रारदार महिलेने फोनवरुन 1500 रुपयांची वाईनची (wine) बाटली ऑनलाईन मागविली. परंतु त्या वाईन शॉपच्या कर्मचाऱ्याने त्या महिलेकडून एकूण 69 हजार 700 रुपये उकळून तिची फसवणूक केली.

रिपोर्ट्सनुसार, 26 ऑक्टोबर रोजी समता नगर पोलीस (Police) स्टेशनमध्ये याबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये पीडितेने उघड केले की तीने तिच्या बहिणीच्या वाढदिवसाठी वाईनची बाटली भेट देण्यासाठी म्हणून ऑनलाईन मागविली होती. तिने गुगलवरून एका वाईन शॉपचा नंबर मिळवला.

Wine
व्हेल माश्याची 'उलटी' विकली जाते 1 कोटीला..

सुरुवातीला, फसवणूक करणार्‍या या वाईन शॉपच्या कर्मचाऱ्याने तिला आगाऊ रक्कम म्हणून 1,500 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर, त्याने प्रोसेसिंग फी (Processing fee) म्हणून आणखीन पैशाची मागणी केली आणि काही तांत्रिक अडचणींचा हवाला दिला.

जेव्हा पीडितेला यात आपण फसलो असल्याचे जाणविल्याने तिने दिलेल्या रकमेचा परतावा मागितला तेव्हा त्याने तिला एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करून तुमचे पैसे परत मिळतील असे सांगितले. परंतु तिने ती लिंक उघडल्यावर एक पोर्टलवर (portal) ओपन झाले, त्यानंतर तिचे आधी गेलेले पैसे तर मिळालेच नाहीत परंतू त्यात तिच्या बँकेतून अधिकचे पैसे गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com