मलावीचा हापूस भारतात दाखल; जाणून घ्या किती आहे दर?

नोव्हेंबरमध्ये हा आंबा (Mango) तयार होत असून तो भारतासह इतर देशात विक्रीसाठी पाठविला जातो. कोकणातील (Konkan) हापूसची चव या आंब्याला आहे.
मलावीचा हापूस भारतात दाखल; जाणून घ्या किती आहे दर?
मलावीचा आंबाDainik Gomantak

मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Market Committee) मलावी देशातील (Malawi country) आंब्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास 230 बॉक्स विक्रीसाठी आले. बाजारामध्ये हा आंबा 1200 ते 1500 रुपये किलो दराने हा आंबा विकला जात असून, 15 डिसेंबरपर्यंत याच्या हंगामास सुरुवात होईल.

दक्षिण पूर्व आफ्रिकेत मलावी देशातील आंबा काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येत आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या (Diwali) दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांकडून त्याला त्याला पसंती मिळते. हा आंबा मुंबई बाजारात दाखल झाला आहे. यामध्ये 3 किलो वजनाचा एक बॉक्स असून, त्यामध्ये 9 ते 12 आंबेच बसतात. आणि या एका पेटीची किंमत 3600 ते 4500 इतकी आहे.

मलावीचा आंबा
राजधानीत आंब्याची आवक वाढली

दर वाढण्याचे कारण:

याचा दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी हवाई वाहतुकीवरील खर्च वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दराने हा आंबा विकत घ्यावा लागणार आहे. याला होलसेल मार्केटमध्ये 1200 ते 1500 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. मुंबईमध्ये 15 डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम (Mango season) सुरू राहणार असून पुढील एक महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.

400 एकरवर आंबा उत्पादन:

मलावी या देशात कोकणा सारखे वातावरण आहे. या भागातील शेतकऱ्यांनी 2011 मध्ये हापूस आंब्याची रोपे भारतातून घेऊन गेले होते. तेथे त्यांनी 400 एकरमध्ये आंबा लागवड केली. यामध्ये एक एकरमध्ये 400 रोपांची लागवड करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये हा आंबा तयार होत असून तो भारतासह इतर देशात विक्रीसाठी पाठविला जातो. कोकणातील हापूसची चव या आंब्याला असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणत पसंती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com