वैद्यकीय उपचारातही मालेगावचा जुगाड

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

कोरोना बाधितांची घरीच ओटू व उपचार करून मात

प्रमोद सावंत 
मालेगाव

राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. रोज वीस- पंचवीस अहवाल पॉंझिटिव्ह येवू लागल्याने दाटीवाटीची लोकवस्तीच्या या शहराचे काय होणार अशी चिंता अनेक व्यक्त करू लागले व अजूनही करीत आहेत. मात्र, प्रयोगात आघाडीवर असलेल्या मालेगावकरांनी कोरोनावर घरीच उपचार करून मात करण्यास प्रारंभ केला आहे. कोरोनावर कोविड सेंटर मध्ये केले जाणार उपचार व पद्धती जाणून घेत, स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने घरीच कोरोना संशयितांनी ओटू कॉन्सट्रेटर व ऑक्‍सीजन लावून उपचार सुरू केले आहेत. अनेकजण यातून कोराना मुक्त झाले आहेत.
गेल्या पंधरा दिवसात पूर्व भागातून पन्नासपेक्षा जास्त रूग्ण आले नाही. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्‍क्‍यांवर आले. शहरातील मयतीचे "मिट्टी देने चलो भाईयो' पुकारे कमी झाले. सहा दिवसात बडा कब्रस्तानात फक्त 27 दफनविधी नोंद झाली. नैमित्तिक सरासरापेक्षा ही संख्या कमी आहे. एप्रील महिन्यात येथे तिप्पट दफनविधी झाल्याने हाहाकार माजला होता. शहरात क्षयरोग, दमा, अस्थमा, मधुमेह असलेले रूग्ण मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे शिकार झाले. काहींना वेळेवर उपचार, ऑक्‍सीजन मिळू शकले नाही. या सर्व दुर्घटनातून बोध घेत शहर सावध झाले. नागरिकांनी ऍलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी या सर्व पॅथींचा वापर केला. त्याशिवाय हकीम व मन्सुराचा काढा यांचाही वापर झाला. हाय रिस्क रूग्णांना ऑक्‍सिजनची गरज ओळखून अनेकांनी सुमारे 40 ते 50 हजार रूपये किंमतीचे ओटू कॉन्सट्रेटर खरेदी केली. ओटूचे यंत्राची विक्री 60 ते 70 ने वाढली. काहींना ऑक्‍सीजन सिलेंडर स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने घरी भाडेतत्वावर उपलब्ध करून घेतले. शंभरपेक्षा अधिक ऑक्‍सीजन सिलेंडर या पद्धतीने वापरात आहे. कोरोनामुक्त झालेले गल्ली मोहल्ल्यातील रूग्णही हा आजार जीवघेणा नाही. जुजबी उपचार व काळजी घ्या बरे व्हाल, असा संदेश देत दिलासा देत आहे.
पूर्व भागातील रूग्णसंख्या घटल्याने रमजाननंतर रूग्ण मोठ्या संख्येन वाढतील यासाठी भव्य टेंट कोविड सेंटरची उभारणी मागे पडली. याउलट जीवन, मन्सुरा, म्हाळदे, सहारा हे कोविंड सेंटर बंद पडले. पूर्वेकडे फरान व हज सेंटर सुरू आहे. हज सेंटरला पाच दहा रूग्ण आहेत.

शिव्यांची लाखोली खाणारे डॉक्‍टर आता देवदूत
कोरोना पॉंझिटिव्ह रूग्णांना दिली जाणारी युनिर्व्हसल ट्रिंटमेंट शहरात अनेकांना ठावूक झाली आहे. पहिले पाच दिवस एचक्‍युसी टॅबलेट पाचशे व दोनशे मिलीग्राम, अँण्टीबायोटीक इंजेक्‍शन अझीप्रोमाईसीन पाचशे, पॅंरासिटेमॉंल सकाळ, संध्याकाळ गोळ्या, व्हिटॅमिन सी टॅबलेट. गंभीर रूग्णास आँक्‍सीजन व अंत्यवस्थ रूग्णास व्हेंटीलेटर. एसपीओटू 94 पेक्षा कमी झाल्यास. ट्रिटमेंट प्रोटोकॉंल माहिती झाल्याने उपचार सुलभ झाले आहेत. खासगी डॉंक्‍टरांना पीपीई कीट मिळाल्याने घरगुती उपचारात मदत झाली आहे. महिन्यापूर्वी शिव्यांची लाखोली खाणारे डॉक्‍टर आता देवदूत ठरत आहे.

ओटू यंत्र विक्री : 70
खासगी तत्वावर घरपोच सिलिंडर : 100
एचक्‍युसी टॅबलेट विक्री : 60 हजार

संबंधित बातम्या