बापरे..! मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 14 डिसेंबर 2020

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक 29 वर्षीय व्यक्ती हरवल्याची तक्रार आली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेएकाचा  मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 

औरंगाबाद- जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंगापूर पोलिसांत मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक 29 वर्षीय व्यक्ती हरवल्याची तक्रार आली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेएकाचा  मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 

अमळनेर येथील गणेश दामोदर मिसाळ(29) हे गेल्या वर्षी 10 ऑक्टोबरला हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी गंगापूर पोलिसांत नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत याप्रकरणी दोघांना अटक केली होती.  त्यांच्याकडे अधिक तपास केला असता 5 ऑक्टोबरला एका शेतात मिसाळ यांना फाशी देऊन त्यांनीच मारले असल्याची कबुली दिली.   

  का आणि कशी केली हत्या? 

गणेश हरवण्याआधी दुचाकीवरून जाताना दोघा आरोपींबरोबर शेवटचा दिसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना त्यादृष्टीने पुढील तपास सुरू ठेवला. यानंतर पोलिसांना आरोपीच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती झाल्यावर 6 महिने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. यात तब्बल 6 महिने गेल्यावर पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाने  मृत मिसाळ यांना गावातीलच एका महिलेशी आपले अनैतिक संबंध असल्याचे माहिती असल्याने त्याला येथील एका शेतात ठार मारल्याचे सांगितले.   
 
आरोपींनी दिलेल्या माहितीनंतर हत्या झालेल्या जागी पोलिसांनी दोन्ही आरोपींना घेऊन जात मृतदेहाबाबत विचारपूस केली असता त्यांनी तीन फूट खड्डाकरून मृतदेह पुरला असल्याची माहिती दिली. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.  

याप्रकरणी औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील  यांनी गंगापूर पोलिसांचे कौतुक करत त्यांना 15000 हजारांचा इनाम देणार असल्याची घोषणा केली. 

संबंधित बातम्या