खोटा बॉम्ब घेऊन बँकेत घुसलेल्या व्यक्तीने उपचारासाठी मागितले 55 लाख

खोटा बॉम्ब घेऊन बँकेत घुसलेल्या व्यक्तीने उपचारासाठी मागितले 55 लाख
hand cuffs.jpg

महाराष्ट्राच्या (Maharashtra) वर्धा जिल्ह्यातील एका बँकेत (Bank) घुसून एका व्यक्तीने बॉम्बने बँक उडवून (Bomb Blast) देण्याची धमकी दिली आणि सर्वांचेच धाबे दणाणले. चेहरा झाकलेला एक जण बँकेत आला आणि त्याने पैशाची मागणीकरत ती मागणी पूर्ण न केल्यास बॉम्बने बँक उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या व्यक्तीने 15 मिनिटात 55 लाख रुपये द्या अन्यथा मी बॉम्बने बँक उडवून देईल अशी धमकी एका कागदावर लिहून तो कागद कर्मचाऱ्यांकडे दिला होता.  (man went to the bank with the bomb and demanded Rs 55 lakh for treatment)

वर्ध्यात घडलेल्या या घटनेत त्या व्यक्तीने दिलेल्या पत्रामध्ये आपण एका दुर्धर आजाराचा रुग्ण असल्याने आपल्याला पैशांची आवश्यकता आहे असे लिहिले होते. तसेच आपल्याला कडे आता असेही काहीच उरले नसून जर तुम्ही पैसे दिले नाही तर आपल्याकडे असलेल्या बॉम्बने बँक उडवून देईल अशी धमकी कर्मचाऱ्यांना दिली होती. ही बँक पोलीस ठाण्याच्या समोरच असल्याने बँक कर्मचाऱ्यांनी त्वरीत पोलिसांना ही गोष्ट कळवली होती. 

दरम्यान या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, त्या व्यक्तीकडे बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घटली, तेव्हा पोलिसांना तो बॉम्ब नसून, डिजिटल घड्याळ आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसने भरलेले दोन पाईप त्या व्यक्तीकडे सापडले आहे. तसेच त्या व्यक्तीकडे चाकू आणि एअर पिस्टल देखील सापडले आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com