Big Breaking : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 मार्च 2021

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसहित सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसहित सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे मानण्यात येत आहे. कळवा पुलावरून उडी घेऊन मनसुख हिरेन यांनी आपला जीव दिला असल्याचे समजते. तर याच्या काही काळ अगोदरच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना, मनसुख हिरेन यांचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे, असे म्हटले होते. 

गडचिरोलीत शेकडो नक्षलवाद्यांनी पोलिस पक्षावर केला हल्ला, हवाई दलाची घेतली मदत

मनसुख हिरेन यांनी यापूर्वी आपली कार चोरीला गेली होती, व त्यासाठी एफआयआर देखील दाखल केला असल्याचे सांगितले होते. तर मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आली होती. व कारमधून जिलेटिनच्या 20 कांड्या मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सभोवताल असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून पोलिसांनी संशयितांना ओळखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संशयितांनी मास्क घातला असल्यामुळे अधिक माहिती पोलिसांना मिळू शकली नव्हती. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या प्रसिद्ध 'संदेश मिठाई'ला देखील...

यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या घटनेसंदर्भात बोलताना, एएनआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय तपास करत असलेले अधिकारी सचिन वझे आणि मनसुख हिरेन हे बर्‍याच दिवसांपासून संपर्कात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र त्यानंतर आता मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.    

संबंधित बातम्या