महाराष्ट्रातील कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर...

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 मार्च 2021

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज एका दिवसात 593 रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात थैमान घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज एका दिवसात 593 रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात थैमान घातल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा दिवसात जवळपास 3 हजार रुग्ण वाढले आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेकडून व्यापारी आणि दुकानदारांची अँटीजेन टेस्ट सुरु करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. तर कल्याणमधील गजबजलेल्या डी मार्ट मध्ये तपासणी केली असता 110 पैकी सहा कर्मचारी हे कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे डी मार्ट पाच दिवसांकरीता सील करण्यात आले असून अन्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे.

Maharashtra Corona Update: नागपुरात 'कोरोना स्फोट' भाजी आणि धान्याची...

लॉकडाऊनच्या भितोपोटी डी मार्ट मध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. यावेळी पोलिसानी कारवाई करुन सुद्धा डी मार्ट मध्ये लोक खरेदीसाठी जमत होते. आता कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात अन्य किती लोकं आले आहेत याचा अंदाज येत नसल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.

फडणवीसांच्या आरोपांवर राऊत म्हणाले, हमाम मे सब...

दरम्यान, देशातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब आणि केरळ या राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोनाचे नवीन सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याचे समोर येत आहे. मागील 24 तासात 23,179 कोरोनाचे नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात 84 जणांनी आपला जीव गमावला आहे. याशिवाय, 1,52,760 कोरोनाची सक्रिय प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. आणि आतापर्यंत राज्यात कोरोना बाधितांची संख्या 23,70,507 वर पोहचली आहे. यातील, 21,63,391 रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत.

संबंधित बातम्या