Mucormycosis: उपचारादरम्यान अनेकांना गमवावी लागतेय दृष्टी ...

Many people lose their sight during Mucormycosis treatment
Many people lose their sight during Mucormycosis treatment

कोरोना नंतर आता देशात म्युकरमायकोसिस (Mucormycosis)आजाराचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर अजून एक संकट निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळते आहे. बुरशी सदृश्य असणारा हा आजार कोरोना मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना होत असल्याचे पाहायला मिळते आहे. या आजारामुळे काही रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागत असल्याचे काही धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात देखील अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. (Many people lose their sight during Mucormycosis treatment)

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करताना डोळ्याजवळ झालेल्या या आजाराचा संसर्ग होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून  रुग्णाचा डोळा काढून टाकावा लागतो. तसेच काही रुग्णांचे रुग्णांचे दोन्ही डोळे काढून टाकण्याचे मोठे निर्णय आम्हाला घ्यावे लागत असल्याचे डॉक्टरांकडून माध्यमांना सांगण्यात आले आहे. लक्षण दिसून सुद्धा लवकर उपचार न घेतलयाने या आजाराचे गांभीर्य वाढते आणि त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच या रोगावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले औषध अ‍ॅम्फोटेरिसिन बी (Amphotericin b) हे उपलब्ध नसल्याने देखील अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे  डॉक्टरांकडुन सांगण्यात येते आहे. 

म्युकरमायकोसिसमुळे काढून टाकावा लागू शकतो मात्र सर्वच प्रकरणांमध्ये डोळा काढून टाकण्याची आवश्यकता नसते.  जेव्हा या आजारामुळे रुग्णाच्या नर्व्ह सिस्टिमला धोका असतो अशा वेळीच रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डोळा काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो. कान-नाक-घशावर उपचार करणारे डॉक्टर, दंतरोगतज्ञ आणि नेत्ररोगतज्ञ अशा या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन या आजाराबद्दलची माहिती गोळा करण्यासंबंधितच निर्णय घेतला आहे. "यामध्ये डोळे काढण्याच्या काही गघटना आणि एकूणच सर्व उपचाराबद्दलचे तपशील गोळा केले जातील" अशी माहिती नागपूर नेत्ररोगतज्ञ सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. मोहन मजुमदार यांनी सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com