मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता आरक्षण पूर्ववत होण्यासाठी सरकारने कायदेशीर पावले उचलावीत, असे आवाहन करत याच मागणीसाठी दहा ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा आज गोलमेज परिषदेत केली.

कोल्हापूर: मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता आरक्षण पूर्ववत होण्यासाठी सरकारने कायदेशीर पावले उचलावीत, असे आवाहन करत याच मागणीसाठी दहा ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा आज गोलमेज परिषदेत केली.

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी विविध योजना जाहीर केल्या त्यासाठी पैसे कुठून आणणार, अशी विचारणाही पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर असंतोष खदखदत असताना कोल्हापुरातून राज्यव्पापी आंदोलनाची दिशा निश्‍चित व्हावी, यासाठी गोलमेज परिषद झाली. 

संबंधित बातम्या