मराठा आरक्षण: छत्रपती संभाजीराजे नक्षलवाद्यांना आवाहन करत म्हणाले...
SAMBHAJI.jpg

मराठा आरक्षण: छत्रपती संभाजीराजे नक्षलवाद्यांना आवाहन करत म्हणाले...

महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) कायदा रद्द केल्यापासून राज्यात वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असताना छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यातच आता मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांनी (Naxalites) पाठिंबा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच एक पत्रक देखील सध्या चांगलंच चर्चेत आहे. गडचिरोलीमधील (Gadchiroli) नक्षलवाद्यांकडून हे पत्रक काढण्यात आले असून मराठा समाजाने राज्यातील दलाल नेत्यांपासून सावध रहावे, असा इशारा त्यामधून देण्यात आला आहे. या पत्राची दखल घेत संभाजीराजांनी (Sambhaji Raje) नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी मराठा आरक्षाणाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद करत एक आवाहन देखील केले आहे. (Maratha reservation Chhatrapati Sambhaji Raje appeals to Naxalites and says) 

काही नक्षलवादी संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे माझ्या वाचनामध्ये आले होते. मराठ्यांनो आम्ही तुमची वाट पाहत आहोत. असेही यावेळी ते म्हणाले. मराठा समाजाचा एक घटक तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) वंशज या नात्याने, मी त्यानांच आवाहन करतो की, नक्षलवाद्यांनो या आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत. मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हा, आपल्या देशाने लोकशाहीचा पुरस्कार केला आहे.

छत्रपती महाराजांचा राज्यकारभार पाहिला तर, त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापून खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बिजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज असलेले छत्रपती शाहू महाराजांना डॉ. आंबेडकरांनी  one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते.  त्यांचा रक्ताचा वारसदार म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की, इथल्या हजारो वर्षाच्या संस्कृतीला अनुसरुन बाबासाहेबांनी भारतात लाोकशाही राज्य व्यवस्था स्थापण्यासाठी कार्य केले. तुम्ही सुध्दा या लोकशाहीचे पाईक व्हा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मराठा समाजाने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्यानंतर विदेशी शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने सातत्याने आपले बलिदान दिले. महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वातंत्र झाल्यानंतरही कायम राहीला. आजही मराठा समाज लोकशाहीचे संरक्षण करण्यात सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे सपुत हिमालयाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करुन सीमेवर उभे आहेत. मला मान्य आहे, स्वांतत्र्यानंतर मराठा समाजावर अनेक प्रकारे अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून आमचे हक्क मागत आहोत. आंदोलने, मोर्चे, न्यायालयीन लढाई, चर्चा लॉंग मार्च इ. मार्ग आम्ही स्वीकारत आहोत. जगभरात मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चांची दखल घेतलाी होती. छत्रपती महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढे सर्वांना सोबत घेऊन आम्ही जाऊ. आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू.

''कोणतीच व्यवस्था ही परिपूर्ण नसते. त्यामध्ये काही उणिवा असतातच. लोकशाहीबाबत काहींचे मत हे वेगळे असू शकते. पण जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने देखील स्वीकार केला आहे. काही उणिवा आजही असतील मात्र आपण त्यामध्ये सुधार करण्याचे प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा मार्ग चांगला आहे. मात्र तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक लोकशाही व्यवस्थेसाठी योग्य नसतील ही, परंतु म्हणून सगळी व्यवस्थाच कुचकामी असेल असे काही नसते. लोकांना शिक्षित करुन, चांगल्या आणि वाईट गोष्टींची जाणीव करुन देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करुन देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे.''
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com