बिहार निवडणुकीत मराठी नेतेही चांगलेच सक्रिय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

भाजपने फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. आठवले यांनी राज्यातील 15 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर आंबेडकर यांनी प्रगतीशील लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाआघाडीच्या बरोबर आहे. 

पाटणा- कोरोनाकाळात प्रथमच होत असलेल्या बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेतेही रस घेत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेही बिहारच्या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. 
भाजपने फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. आठवले यांनी राज्यातील 15 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर आंबेडकर यांनी प्रगतीशील लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाआघाडीच्या बरोबर आहे. 

फडणवीस यांचा दुहेरी उपयोग

भाजपचे बिहारचे प्रभारी भुपेंद्र यादव असताना पक्षाने यावेळी प्रथमच निवडणुकीसाठी स्वतंत्र प्रभारीपदी फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस यांच्या संघटन कौशल्याचा पुरेपूर उपयोग या निवडणुकीत करण्याचा उद्देश यामागे भाजपचा असल्याचे दिसते. 

संबंधित बातम्या