'सुनेला घरकाम करायला लावणे ही क्रूरता...', हायकोर्टाने फेटाळला महिलेचा अर्ज

Bombay High Court: विवाहित महिलेला घरातील कामे करण्यास सांगणे म्हणजे क्रूरता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे.
Bombay High Court
Bombay High CourtDainik Gomantak

Bombay High Court: विवाहित महिलेला घरातील कामे करण्यास सांगणे म्हणजे क्रूरता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे. तिची तुलना मोलकरणीच्या कामाशीही होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. खरे तर एका महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला होता की, 'लग्नानंतर महिनाभर तिला चांगली वागणूक देण्यात आली होती, मात्र त्यानंतर घरातील सदस्य तिच्याशी मोलकरणीसारखे वागू लागले.'

दरम्यान, महिलेचा अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने (High Court) म्हटले की, 'जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरातील काम करायला सांगितले जात असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जाते. जर स्त्रीला घरातील कामे करायची इच्छा नसेल तर तिने लग्नापूर्वी (Marriage) सांगायला हवे, जेणेकरुन वराला लग्नाआधी पुनर्विचार करता येईल.'

Bombay High Court
''...म्हणून नोकरीसाठी महिलेला जबरदस्ती करता येणार नाही'': मुंबई उच्च न्यायालय

नुसते सांगायचे नाही तर

न्यायालयाने आदेशात म्हटले की, 'महिलेने (Woman) केवळ तिचा छळ झाल्याचे सांगितले होते, मात्र तिच्या तक्रारीत कोणत्याही कृत्याची माहिती नव्हती. भारतीय दंड संहितेच्या कलम 498A साठी केवळ मानसिक आणि शारीरिक अपमानास्पद शब्दांचा वापर पुरेसा नाही जोपर्यंत अशा कृत्यांचे वर्णन केले जात नाही.'

Bombay High Court
मुलांच्या विकासासाठी आई-वडिल दोन्ही महत्वाचे: मुंबई उच्च न्यायालय

पती आणि सासूविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द

त्यावर न्यायमूर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने 21 ऑक्टोबर रोजी महिलेचा पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला. महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पती आणि सासूवर घरगुती हिंसाचार आणि क्रूरतेचा आरोप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com