''कदाचित ही शेवटची गुड मॉर्निंग" म्हणत डॉक्टर महिलेने सोडले प्राण

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

कोरोनाची स्थिती देशभर चिंताजनक आहे.

कोरोनाची स्थिती देशभर चिंताजनक आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. कोरोनामुळे अनेक डॉक्टरांनी आपले प्राणही गमावले आहेत. अलीकडेच मुंबईतील एका 51 वर्षिय महिला डॉक्टरांनी फेसबुकवरती भावनिक पोस्ट लिहिली आणि त्यांनतर 36 तासाने त्यांच्या मृत्यू झाला. कोरोनामुळे  सोमवारी रात्री सेवरी टीबी हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांचे निधन झाले. सर्वात दुखद बाब म्हणजे, फेसबुकलावरती पोस्ट लिहून 36 तासांनंतर त्यांनी जगाला सदैव निरोप दिला. ("Maybe this is the last good morning," said the doctor)

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; दहावीच्या परिक्षा रद्द!

रविवारी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले, "कदाचित ही शेवटची सुप्रभात असू शकेल. या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला यापुढे भेटू शकणार नाही. लक्षात ठेवा. शरीर मृत आहे. आत्मा नाही. आत्मा अमर आहे." अशा भावनिक शबदात त्यांनी लिहून आपले प्राण सोडले. डॉक्टर मनीषा या क्षयरोगाच्या उपचारावरील तज्ञ होत्या आणि सेव्हरी टीबी हॉस्पिटलमध्ये काम करायच्या. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए)  अहवालानुसार आतपर्यंत ७४७ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

20 एप्रिल 2021 रोजी देशभरात कोरोनाच्या रुग्णांनी रेकॉर्ड तोडले आहेत. आकडेवारीनुसार, गेल्या एका दिवसात, भारतात पहिल्यांदाच सुमारे ३ लाख रुग्ण आढळले आहेत. तसेच मृत्यूनेही आतापर्यंतचे रेकॉर्ड तोडले आहेत. अनेक राज्यांनी निर्बंध लावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लोकडाउन हा शेवटचा पर्याय असल्याचेही सांगितलेले आहे. त्यामुळे राज्ये आणि केंद्र कोरोनाची साखळी तोडण्यास समर्थ ठरेल का? 

संबंधित बातम्या