Mumbai News: मुंबईकरांनो सावधान! गोवर उद्रेकाची स्थिती, वेळीच व्हा सावध

मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे.
Mumbai News |Measles
Mumbai News |MeaslesDainik Gomantak

मुंबईकरांना (Mumbai) चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण मुंबईमध्ये गोवर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचे समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून काल गोवरचे सर्वाच अधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली. आज देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे. 

मागील दोन महिन्यात गोवरचे 84 रुग्ण समोर आले आहेत. महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य (Health) कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जीवनसत्व अ देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते. 9 महिने आणि 16 महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाची (Vaccine) अतिरिक्त सत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे तसेच बालकांची तपासणी केली जात आहे. खासगी डाॅक्टरांना गोवर आजार तसेच लसीकरणाबाबत सांगितले जात आहे.

Mumbai News |Measles
Maha Tourism: सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाच्या जाहिरातीचा प्रस्ताव, तारकर्लीत सात राज्यांची बैठक
  • काय आहे लक्षणे

वेळेवर उपचार न घेतल्यास गोवर हा लहान मुलांसाठी (Child) धोकादायक संसर्ग असल्याचे सिद्ध होऊ शकतो, असं तज्ञांचे म्हणणे आहे. याची चार प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसतात. 104 अंशांपर्यंत उच्च ताप, खोकला, वाहती सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे. गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात तेव्हा 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात. त्याच वेळी, 3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com