पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या बसमधून 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांची गोवा बस वर धडक कारवाई
पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या बसमधून 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Medication worth Rs 3 crore seized from Pune-Goa busFile Image

पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) पथकाने एका व्यक्तीला आज अटक केली हा व्यक्ती पुण्यातून गोवा ला जात होता. पुणे जिल्ह्यातील गोवा (Pune Goa Bus) जाणाऱ्या बसमधून तो 6 किलो अंमली पदार्थ गोव्याला घेवून निघाला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्याच्याकडून 6 किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती भोर उपविभागाचे एसडीपीओ धनंजय पाटील यांनी दिली.

Medication worth Rs 3 crore seized from Pune-Goa bus
सायबर गुन्हे तपासाला मिळणार गती!

पाटील यांनी असेही सांगितले की जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमीतकमी 3 कोटी रुपये आणि भारतीय बाजारपेठेत 33 लाख रुपये असणे अपेक्षित आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्याच्या पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गोवा जाणाऱ्या बसमधून हा अंमली पदार्थ जप्त केला.

अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मोस्ताकिन धुनिया आहे आणि आरोपीवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.