मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत वाढ

दैनिक गोमंतक
बुधवार, 24 मार्च 2021

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने अनेक  जिल्हे लॉकडाउन करण्याच्या निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतलाय  सामान्य नागरिकापासून ते राज्यातील मंत्री, उद्योजक आणि कलाकारानाही कोरोनाचा विळखा बसला आहे. यामुळे राज्यसरकारचीही झोप उडाली आहे.  

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर-नोवहेबर कमी झालेला कोरोनाचा संसर्ग फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने अनेक  जिल्हे लॉकडाउन करण्याच्या निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतलाय  सामान्य नागरिकापासून ते राज्यातील मंत्री, उद्योजक आणि कलाकारानाही कोरोनाचा विळखा बसला आहे. यामुळे राज्यसरकारचीही झोप उडाली आहे.  कोरोनाचा  प्रादुर्भाव जसजसा वाढत आहे, तसतसा राज्यात लॉकडाउन करण्यासंबंधीच्या शक्यताही वाढत आहेत. अशातच राज्यसरकारमधील अनेक नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकार अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. अशातच आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच संपर्कात असणाऱ्या काही मंत्र्यांचे कोरोना रिपोर्ट  पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी  ठाकरे यांनादेखील कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता सर्वांचीच चिंता वाढली आहे.  विशेष म्हणजे अभिनेता अमीर खानदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. 

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेच मुख्य आरोपी - महाराष्ट्र एटीएस  

काही दिवसांपूर्वी आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव' स्पर्धेचा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी आमीर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोरोना होऊ नये यासाठी आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आता कोरोना पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात एकूण 2,30,641 सक्रिय रुग्ण असून काल दिवसभरात 28,699 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर आतापर्यंत एकूण 22,47,495 रुग्ण बरे होऊन घरी  गेले आहेत. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% वर पोहचले आहे.

संबंधित बातम्या