गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार; सिलेंडर तुटवड्यामुळे ग्राहक त्रस्त
Gas CylinderDainik Gomantak

गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार; सिलेंडर तुटवड्यामुळे ग्राहक त्रस्त

ग्राहकांना ऑनलाइन(Online) बुकिंगची (Booking)सेवा ही कुचकामी ठरत आहे. तसेच ग्राहकांना एजन्सीपर्यंत आपला रिकामा सिलिंडर घेऊन जात आहेत.

रत्नागिरी: सिलेंडरचा तुटवडा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. यामुळे वेटिंग लिस्टवर (waiting list)बरेच ग्राहक आहेत. अणुस्कुरा घाटातून येणाऱ्या सिलिंडर वाहतुकीमुळे त्याचा वितरणावर मोठा परिणाम होत आहे. गॅस ट्रान्स्पोर्टच्या (gas transport)गाड्या वेळेवर न आल्याने वितरण व्यवस्थेवर त्याचा मोठा परिमाण होत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था कोलमडली आहे. अश्या मध्ये ग्राहकांना ऑनलाइन(Online) बुकिंगची (Booking)सेवा ही कुचकामी ठरत आहे. तसेच ग्राहकांना एजन्सीपर्यंत आपला रिकामा सिलिंडर घेऊन जात आहेत. बुकिंग करूनही 3-3 दिवस सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. या कारणामुळे गॅस एजन्सीमध्ये तोबा गर्दी होत आहे.

Gas Cylinder
 रत्नागिरी जिल्ह्यातील 30 धरण ओव्हरफ्लो

गॅस कंपनीच्या गाड्या याआधी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील (Ratnagiri)एजन्सींपर्यंत आलेनंतर सिलिंडर वितरण सुरू होत होते. ऑनलाइन बुकिंसाठी एजन्सीकडून वेगळ्याच गाड्या आहेत. ज्यांना नागरिकांना तत्काळ सिलिंडर पाहिजे असेल त्यांनी रिकामे सिलिंडर घेऊन थेट एजन्सीकडे येऊन भरलेला दुसरा भरलेला सिलिंडर घेता येतो. मात्र काही दिवसांत ऑनलाइन बुकिंगचे बारा वाजेलेले आहेत. यामध्ये अनेकांनी तर पंधरा दिवसापासून ते महिना झाले अद्याप पर्यंत ऑनलाइनला नंबर लावूनही सिलिंडर मिळालेलाच नाही आणि याचाच परिणाम म्हणून एजन्सीवर (agency)तोबा गर्दी दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.