शिवसेनेतील हप्तेखोरांची नावे जाहीर करावीच...

राणेंनी शिवसेनेवर (ShivSena) आरोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकास कामध्ये किती हातभार आहे?
शिवसेनेतील हप्तेखोरांची नावे जाहीर करावीच...
वैभव नाईक Dainik Gomantak

महाराष्ट्र: चिपी विमानतळाचे (Airport)उद्या मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केंद्रीय हवाई मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याच्याच आदी श्रेयवादावरून राजकीय शिमग्याला उधाण आले आहे. नारायण राणे याचे चिपी विमानतळच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रोटोकॉल प्रमाणे नाव टाकले नाही याला आमदार वैभव नाईकानी प्रतिउत्तर दिले.

खरं तर नारायण राणे यांनी नावे हिंमत असेल उघड करावी मुंबई - गोवा महामार्गच्या (Mumbai - Goa Highway) हायवेच्या कामाला का सुरुवात झाली नाही आणि सुरुवात झाल्या नंतर चिखल फेक करून कोणी काम थांबवलं होत आणि कुठल्या वाटाघाटीमध्ये काम सुरू झाले हे सुद्धा आम्ही उघड करू.

वैभव नाईक
मुंबई - सिंधुदुर्ग हवाई यात्रेला 9 ऑक्टोबरपासून 'टेक ऑफ'

रेडी पोर्ट कोणाच्या फायद्यासाठी आहे आणि कोणाची भागेदारी आहे हे सुद्धा आम्ही जाहीर करू. राणेंनी शिवसेनेवर (ShivSena) आरोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकास कामध्ये किती हातभार आहे? जिल्ह्यात होत असलेल शासकीय मेडिकल महाविद्यालयात (Government Medical College) सुद्धा विरोध कोणाचा आहे साखर कारखाना कोणी रद्द केला आपण ज्यावेळी उद्योग मंत्री होते.

त्यावेळी कोणता उद्योग आणला याचे सुद्धा उत्तर नारायण राणे यांनी द्यावे लागणार. शिवसेनेचा एकही कार्यकर्त्यां हप्ता घेत असेल तर तस त्यांनी जाहीर करावे असे थेट आव्हान वैभव नाईक यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.