'राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजू'

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाने 
मनसे-अ‍ॅमेझॉन वादावर नोटीस पाठवून 5 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाने 
मनसे-अ‍ॅमेझॉन वादावर नोटीस पाठवून 5 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसनंतर   अ‍ॅमेझॉन आणि  मनसेचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे.  त्यानंतर कोर्टाने राज ठाकरे आणि पक्ष अधिकाऱ्यांना नोटीस पाठविली आहे. 

राज ठाकरे  यांना नोटीस  पाठवल्यानंतर मनसे आणखीनच आक्रमक झाले. आहे. येत्या काळात अ‍ॅमेझॉनला त्याची किंमत मोजावी लागेल, असे मनसे अधिकारी अखिल चित्रे  यांनी म्हटले आहे.  अ‍ॅमेझॉन ला जर मराठी भाषा नको आहे, तर महाराष्ट्रातही आम्हाला अ‍ॅमेझॉन नको आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी त्यांच्या मोबाईलवरून अ‍ॅमेझॉन अनइंस्टॉल केले आहे. अ‍ॅमेझॉनने जर आमची मागणी मान्य केली नाही तर महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय नक्कीच ठप्प होईल. हे मनसे नेते अखिल चित्रे यांचे म्हणणे आहे. 

चित्रे म्हणाले की, अ‍ॅमेझॉनने ही नोटीस एका मूर्ख वकिलाने तयार केली आहे. त्याने किमान एक चांगला वकील तरी घ्यायला हवा होता. त्यांनी पाठविलेल्या नोटिसला काही अर्थ नाही.  राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया मनसे नेते अखिल चित्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.

मनसे-अ‍ॅमेझॉन नक्की वाद काय?
मनसेने अ‍ॅमेझॉनला त्यांच्या वेबसाइटवर मराठी भाषेला स्थान देण्याची विनंती केली होती. जेणेकरुन मराठी भाषिक लोकांना सोयीची सुविधा मिळेल आणि वेबसाइटवर त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी सहजपणे शोधता येतील. मात्र अ‍ॅमेझॉनकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधात आंदोलन सुरू केले.  दिंडोशी भागात मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनची पोस्टर्सही फाडली होती. यापूर्वी मनसेच्या अधिका्यांनी अ‍ॅमेझॉनच्या बीकेसी कार्यालयावरही छापा टाकला होता.

संबंधित बातम्या