महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचे मोर्चा आंदोलन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

आज संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची पुकारला असून, वाढीव वीज बिलाविरोधातील मनसे मोर्च्यांना राज्यात ठिकठिकाणी सुरूवात झाली आहे.

मुंबई :  आज संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची पुकारला असून, वाढीव वीज बिलांविरोधातील मनसे मोर्च्यांना राज्यात ठिकठिकाणी सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊल दरम्यान आलेल्या वाढिव वीज बिलांवर सवलत देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्राचं राजकारण वीज बिलांच्या मुद्दयावरून तापलं होतं, त्याचवेळी राज ठाकरेंच्या  नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तोपर्यंत नागरिकांनी वीजबिल न भरण्याची विनंती पत्रकार परिषदेदरम्यान केली होती.

याच पार्श्वभूमीवर आज सकाळीच राज्यात ठिकठिकाणा मनसेच्या मोर्च्यांना सुरूवात झाली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सामिल झाल्याचे दिसून आले. पुण्यातील मनसेच्या मोर्च्याला परवानगी नाकारल्याने मनसेचा मोर्चा शनिवारवाड्याजवळ आल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. औरंगाबादमध्येदेखील मनसेच्या  मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मुंबईतील मोर्चात कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. हा मनसेचा मोर्चा वाढीव वीज बिलांविरोधातील आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकना देणार आहेत.

आणखी वाचा :

गोव्यातून सिंधुदुर्गात येताना छुप्या मार्गांचा वापर 

संबंधित बातम्या