मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टात होणार हजर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज  वाशी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी येणार आहेत. कृष्णकुंजातून थोड्याच वेळात राज ठाकरे कोर्टात जाण्यासाठी निघणार आहेत.

नवी मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज  वाशी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी येणार आहेत. कृष्णकुंजातून थोड्याच वेळात राज ठाकरे कोर्टात जाण्यासाठी निघणार आहेत. वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात 30 जानेवारी 2014 रोजी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात भडक वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ला आहे. याच गुन्ह्याप्रकरणातील जबाब नोंदविण्यासाठी राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहे. कोर्टाने त्यांच्यावर कार्टात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. या समन्सला प्रतिसाद देत राज ठाकरे सकाळी आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास बेलापूर न्यायालयात हजर राहणार आहे. त्यानंतर ते मनसेच्या सीवूड्स सेक्‍टर च्या नवीन 50 येथील मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मात्र, राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला इव्हेन्टचे रूप आल्याचे दिसत आहे. नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजकीय इव्हेन्टचे स्वरूप त्याच्या या भेटीला दिले आहे. राज ठाकरे ज्या मार्गाने शहरात येणार आहेत. त्या सर्व मार्गांवर स्वागताची बॅनरबाजी मोठमोठे होर्डींग लावण्यात आले आहे. समर्थकांनी  राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे.  स्वच्छता सर्वेक्षणाच्या कालावधीत शहरभर लावलेल्या या बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. 

शहरभर लागलेल्या या बॅनरमुळे स्थानिक नागरिकही चकीत झाले आह. त्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.  

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

संबंधित बातम्या