बारामतीच्या चहावाल्याची मोदींना दाढी करण्यासाठी 100 रुपयांची मनीऑर्डर

बारामतीच्या चहावाल्याची मोदींना दाढी करण्यासाठी 100 रुपयांची मनीऑर्डर
anil more.jpg

राज्यात कोरोना संसर्ग (Covid19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना मागील दीड वर्षात कोरोनामुळे दोन वेळा लॉकडाऊन (Lockdown) करण्याची वेळ आली. यामध्ये राज्यात अनेकांनी रोजगार गमावले. त्यामुळे नाराज झालेल्या एका बारामतीमधल्या (Baramati) चहावाल्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवत आपल्या मागणीकडे लक्ष वेधले आहे. 

अनिल मोरे (Anil More) असे बारामतीच्या या चहावाल्याचे नाव आहे. इंदापूर (Indapur) शहरातील रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर अनिल मोरे चहाची टपरी चालवतात. मागील दीड वर्षात राज्यात लॉकडाऊन झाल्याने चरितार्थ चालवणे अवघड झाले होते. त्यामुळे मोरे यांनी नाराज होऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाटवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. याबाबत माहिती देताना मोरे म्हणाले, 'आपले पंतप्रधान दाढी वाढवून देशभर फिरत आहेत. जर त्यांना काही वाढवायचे असेल त्यांनी लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करावी. त्यामुळे लोकांच्या समस्या सुटतील. देशाचे सर्वोच्च पद पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे. माझ्या अल्पशा कमाईतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाढी करण्यासाठी 100 रुपयांची मदत पाठवत आहे.'  (Money order of Rs 100 for shaving Modi from Baramati tea house) 

पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदर आहे. आमचा त्यांना त्रास देण्याचा कदापि हेतू नाही. पण कोरोना महामारीमध्ये  लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांसाठी आरोग्यसुविधासह रोजगार वाढवावा, या मागण्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारला असल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले. मोरे यांनी 100 रुपयांच्या मनीऑर्डरसह एक पत्रही पाठवलं आहे. त्यामध्ये मोरे यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. याशिवाय येणाऱ्या काळात देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आल्यास प्रत्येकी एका कुटुंबास 30 हजार रुपये देण्यात यावेत, अशी देखील मागणी मोरे यांनी केली आहे. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com