Monsoon Update: महाराष्ट्रातून अखेर मॉन्सूनची एग्झिट

हवामान विभागाने (IMD) जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार मॉन्सून (Monsoon) 7 जून ते 15 ऑक्टोबर ही सर्वसाधारण तारीख सांगितली होती. यंदा मात्र त्याने 5 जूनला महाराष्ट्रात हजेरी लावली.
Monsoon Update: महाराष्ट्रातून अखेर मॉन्सूनची एग्झिट
Monsoon ReturnedDainik Gomantak

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) अखेर महाराष्ट्रातून (Maharashtra) माघारी परतला (Returned) आहे. गुरुवारी मराठवाड्याचा उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह (Konkan) सर्व महाराष्ट्रातून मॉन्सून निरोप घेतल्याचे हवामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे. यंदा मॉन्सूनचा महाराष्ट्रात 4 महिने 9 दिवस मुक्काम होता. राज्यात यंदा दोन दिवस आधीच दाकळ झालेल्या मॉन्सूनने जाताना एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाया घेतला आहे.

Monsoon Returned
Monsoon Update: देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात

हवामान विभागाने जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार 7 जून ते 15 ऑक्टोबर ही सर्वसाधारण तारीख सांगितली होती. यंदा मात्र त्याने 5 जूनला महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यानंतर 10 जूनला तो संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला. गुरुवारी मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सीमा कोहिमा, कृष्णानगर, बारीपाडा, सिलचर, नालगोंडा, बागलकोट, वेंगुर्ला, मालकांगिरी या भागातून झाला. तसेच ईशान्य भाग पूर्व किनारपट्टी, गोवा व दक्षिण भारताच्या अनेक भागातून तसेच देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने एग्झिट घेतली आहे.

मॉन्सूनच्या दीर्घकालीन परतीची सर्वसाधारण 17 सप्टेंबर आहे. पण यंदा त्याचा मुक्काम 19 दिवसांनी वाढला असून 6 ऑक्टोबरपासून त्याच्या एग्झिटला सुरुवात झाली. 11 ऑक्टोबरला विदर्भाच्या अनेक भागातून, 12 ऑक्टोबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून एग्झिट झाली.

Related Stories

No stories found.