Monsoon: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाची शक्यता

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (Rain warning) देण्यात आला आहे.
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण (Nutritious environment for rain) निर्माण होत आहे.
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण (Nutritious environment for rain) निर्माण होत आहे. Dainik Gomantak

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाच्या क्षेत्राची (Low pressure belt) निर्मिती झाली असून, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण (Nutritious environment for rain) निर्माण होत आहे. यामुळे विदर्भासह राज्यातील इतर भागात पाऊस (rain) वाढणार आहे. आज कोकण अनेक भागात, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण (Nutritious environment for rain) निर्माण होत आहे.
Monsoon Update: पुढील 2 आठवड्यात राज्यात असा असेल पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्राकार स्थितीमुळे ओडिसा, आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा आता मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूचा कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिणेकडे सरकत असून, दोन दिवसात तो सर्वसामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे येणार आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती आणि मॉन्सूनचा पट्टा दक्षिणेकडे आल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी श्रावण सरी बरसत आहेत.

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण (Nutritious environment for rain) निर्माण होत आहे.
Monsoon: राज्यात पुढील काही दिवसांत पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरित भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसतील. असा अंदाज वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com