Monsoon Update: IMD कडून रत्नागिरी आणि रायगडला 'रेड अलर्ट'

यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak

नवी दिल्ली: पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे कोकणातील (Konkan) रायगडसह (Raigad) रत्नागिरीला (Ratnagiri) हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच चिपळूणमध्ये मागील 17 तास मुसळधार सरी कोसळल्या असून पुन्हा एकदा महापुराची स्थिती निर्माण होणार असल्यामुळे एनडीआरएफचं पथक दाखल झाले आहे.

Monsoon Update
Monsoon Update: पुढील तीन दिवस 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने त्याचा थेट परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावरही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यात येणाऱ्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

NDRF ची टीम चिपळूणमध्ये दाखल

रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर एनडीआरएफचे एक पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. 25 जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन एनडीआरएफचे पथक पुण्यामार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. पुन्हा एकदा चिपळूणमध्ये पूर आल्यास रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.

Monsoon Update
Goa Monsoon Updates: तीन दिवस ऑरेंज अलर्ट; मच्छीमारांना इशारा

तसेच, 22 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये महापूर आला त्यावेळी हजारो नागरिकांना या महापुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी शेवटी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. खरं तर पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल 14 तास उशिरा एनडीआरएफचं पथक चिपळूनमध्ये दाखल झाले. मात्र पथक दाखल होईपर्यंत स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरु झाले होते, त्यामुळे नंतर एनडीआरएफच्या टीमला जास्त काही करावं लागले नाही. एनडीआरएफचं पथक बऱ्याच वेळाने चिपळूनमध्ये दाखल झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला निशाणा करण्यास सुरुवात केली.

शिवाय, 9 सप्टेंबरपर्यंत सिंधुदुर्गसह रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. चिपळूमध्ये मागील 17 तास मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचले असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु 22 जुलैच्या महापुराचा धडा घेत पूराची स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. शहरामध्ये विभागवार नोडल अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचे देखील सांगितले आहे. त्याचबरोबर पाणी भरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाकडून भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येतच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com