महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे 2000 हजारांहून अधिक रुग्ण

More than 2000 patients with Mucormycosis  in Maharashtra
More than 2000 patients with Mucormycosis  in Maharashtra

महाराष्ट्रात कोरोना विषाणू साथीच्या आजाराने हाहाकार माजवला आहे. राज्यात कोरोनाचे दररोज 40 हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कडक निर्बंध लादूनही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.  राज्यासह संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. अशताच आता दुसऱ्या एक आजाराने राज्यात हातपाय पसरायला सुरवात केली आहे. कोरोनाने आधीच चिंताजनक वतावरण असताना आता राज्यात म्युकरमायकोसिस’ या आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  राज्यात म्युकरमायकोसिस’चे  रुग्ण दिवासागणिक वाढत चालले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.  (More than 2000 patients with Mucormycosis  in Maharashtra)

राज्यात म्युकरमायकोसिसचे जवळपास दोन हजारांहूं अधिक रुग्ण असल्याची शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत.राज्याच्या आरोग्य विभाग आता कोरोनासह म्युकरमायकोसिस’ आजाराशी लढण्यासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत म्युकरमायकोसिस च्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहितीही यावेळी राजेश टोपे यांनी दिली आहे.

तर चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमध्येही म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळून आले आहेत. म्युकरमायकोसिस’ आजारात 50 टक्के रुग्ण मृत्यू पावतात, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आधीच राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत आता म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस’ चे दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने अंत राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोना प्रमाणे म्युकरमायकोसिस चे रुग्णही वेगाने वाढत आहेत. म्युकरमायकोसिस’चे एक लक्षण ब्लॅक फंगल आहे. यामुळे 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होतोय. डोकेदुखी, नाकाला सूज, सायनस, रक्तसंचय  तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोळ्याच्या बाजूला सूज, अशी अनेक लक्षणे म्युकरमायकोसिस मध्ये दिसून येतात, अशी माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com