Covid Death Compensation: कोरोना मृत्यूनंतर भरपाई मिळवण्यासाठी लागली मोठी रांग

1 लाख 10 हजार अर्ज सध्या मंजुरीसाठी शिल्लक आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार 18 जानेवारीपर्यंत 2.17 लाख अर्ज आले आहेत.
Covid Death Compensation
Covid Death CompensationDainik Gomantak

महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची मदत रक्कम म्हणून देण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या घोषणेनंतर लोकांनी अर्ज पाठवण्यास सुरुवात केली, मात्र आता हे अर्ज सरकारसाठी अडचणीचे ठरले आहेत. राज्यातील मृत्यूंपेक्षा अधिक अर्ज सरकारकडे भरपाईसाठी (Covid Death Compensation) येत आहेत.

Covid Death Compensation
महाराष्ट्रात कोरोनाच्या 46,197 नवीन रुग्णांपैकी 52 हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे

या प्रकरणाबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात 50 हजारांहून अधिक अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर 1 लाख 10 हजार अर्ज सध्या मंजुरीसाठी शिल्लक आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार 18 जानेवारीपर्यंत 2.17 लाख अर्ज आले आहेत. जे राज्यातील मृत्यू प्रकरणांपेक्षा 34 टक्के अधिक आले आहे.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, आलेल्या अर्जांपैकी 30 टक्के अर्ज डुप्लिकेट निघाले आहेत. आम्हाला 2.17 लाख अर्ज आले आहेत, याचा अर्थ राज्यात कोरोनामुळे इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे नाही. उलट भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी लोक खोटे अर्ज पाठवत आहेत.

Covid Death Compensation
Why I Killed Gandhi: खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्रात वादंग

त्यांनी सांगितले की राज्यात आतापर्यंत 1.10 लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. यापैकी 1.01 लाख लोकांना आधीच नुकसान भरपाई मिळाली आहे. या प्रकरणाबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार सुमारे दीड लाख अर्ज योग्य असल्याचे आढळून आले आहे, जे राज्यातील मृतांच्या संख्येपेक्षा 8 ते 10 हजार अधिक असू शकतात.

गुरुवारी महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना संसर्गाचे (Corona) 46 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात 46,197 नवीन रुग्णांसह 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात संसर्गाची 2,58,569 सक्रिय प्रकरणे आहेत. मोठ्या संख्येने वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये, दिलासा देणारी बातमी म्हणजे 24 तासांत 52,025 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

आकडेवारीनुसार, नवीन रुग्णांमधून 5 हजारांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनासोबतच ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोकाही कमी होताना दिसून येत नाही ये. गेल्या 24 तासांत, नवीन प्रकाराची लागण झालेले 125 रुग्ण राज्यात आढळून आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com