Mount Mary Fair 2022: 2 वर्षानंतर मुंबईमधील प्रसिद्ध 'माऊंट मेरी' जत्रेला आजपासून सुरुवात

Mount Mary Fair 2022: या जत्रेला 'वांद्रे महोत्सव' (Bandra Fest) असंही म्हटलं जातं.
Mount Mary Fair 2022
Mount Mary Fair 2022Dainik Gomantak

मुंबईमधील प्रसिद्ध 'माऊंट मेरी' जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या जत्रेला 'वांद्रे महोत्सव' (Bandra Fest) असे देखिल म्हणतात. ही मुंबईतील सर्वात मोठी जत्रा असते. लाखो भाविक मोत माऊलीच्या दर्शनाला येत असतात. रविवारी 11 सप्टेंबर पासून माऊंट मेरीच्या जत्रेला सुरुवात होत असून हा उत्सव 18 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. या जत्रेला 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष ही जत्रा रद्द करण्यात आली होती. पण आज दोन वर्षांनंतर ही जत्रा भरवण्यात येत आहे. या जत्रेमध्ये दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात. माऊंट मेरी चर्चमध्ये भाविक माऊंट मेरी समोर मेणबत्ती लावून नवस बोलतात.

माऊंट मेरी जत्रेचं थेट प्रक्षेपण

'माऊंट मेरी जत्रे'चे (Mount Mary Fair 2022) यंदा प्रथमच युट्बूब आणि ट्विटरवर थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष या यात्रा रद्द करण्यात आली होती. या यात्रेला शतकाहून अधिक परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच आता ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चर्च ऑथॉरिटीने दिलेल्‍या माहितीनुसार, यंदा जत्रेला एक लाख भाविक दर्शनासाठी आणि जत्रेसाठी येतील अशी शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांच्‍या सोयीसाठी आणि स्‍थानिक परिसरातील गर्दी टाळण्‍यासाठी मुंबई (Mumbai) वाहतुक पोलिसांच्‍या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्‍यात आले आहेत.

Mount Mary Fair 2022
Sharad Pawar NCP: 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच', अध्यक्षपदी फेरनिवड

कोरोनाची बंधने शिथील झाल्‍यामुळे देशातील धार्मिक स्‍थळे जनसामान्‍यांसाठी खुली करण्यात आली आहे. तसेच सर्व महोत्सव, जत्रा, यात्रा निर्बंधमुक्त झाल्यामुळे उत्साहात साजरे करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुविधा -

  1. 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

  2. रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती

  3. पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था

  4. कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था

  5. भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था

  6. अनधिकृत स्‍टॉल्‍स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्‍जाव

  7. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत

  8. प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधांकडे लक्ष

  9. देखरेख कक्ष आणि निरिक्षण मनोरा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com