घरपोच मद्यविक्रीसाठी न्यायालयात दाद

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन असून, केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे.

मुंबई

लॉकडाऊन असतानाही राज्य सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे, मात्र नागपूर जिल्ह्यात अद्याप मनाई आहे. त्यामुळे मद्य विक्रेता संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून घरपोच मद्यविक्रीला परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन असून, केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करून मद्यविक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानंतरही नागपूर महापालिकेने मद्यविक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र मद्य व्यापारी संघटनेने नागपूर खंडपीठाकडे याचिका केली आहे. मद्याची घरपोच विक्री करण्यास परवानगी द्या; सर्व नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विक्री करू, असे त्यांनी म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल.

नियमांचा बोजवारा
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्रांव्यतिरिक्त अन्य भागांत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत दोन दिवसांत 62 कोटी रुपयांची दारू विकली गेली. ग्राहकांची गर्दी आणि नियमांचा बोजवारा पाहून महापालिकेने दारूविक्री बंद केली आहे

संबंधित बातम्या