Why I Killed Gandhi: खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्रात वादंग

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभा खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Amol Kolhe
Amol KolheDainik Gomantak

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभा खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु त्यांच्या या चित्रपटावरुन रिलीज होण्याआगोदरच नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी चित्रपटामध्ये नथुराम गोडसेचे भूमिका साकारण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र दुसरीकडे कोल्हे यांच्या या चित्रपटावर एनसीपीच्या काही दिग्गज नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. (MP Amol Kolhe will play the role of Nathuram Godse in the film Why I Killed Gandhi)

खासदार अमोल कोल्हे म्हणाले...

''सोपी आणि साधी गोष्ट असते. ज्यावेळी आपण एक कलाकार म्हणून एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्यामधील प्रत्येक भूमिकेशी कळत न कळत सहमती असते. त्यामध्ये काही घटनांशी आपली शंभर टक्के वैचारीक सहमती असते. तर अनेकदा आपण साकारत असणाऱ्या भूमिकेशी सहमती नसते. तरीही आपल्याला त्या त्या चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार अशा आव्हानात्मक भूमिका साकारत असतो. मी माझ्या सोशल मिडियावरील फेसबुक पोस्टमध्ये जे लिहलं आहे त्याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे.''

Amol Kolhe
Maharashtra School Reopen: सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार; ठाकरे मंत्रीमंडळाचा निर्णय

ते पुढे म्हणाले, ''मी 2017 मध्ये अशा चित्रपटामध्ये काम केलं होतं. आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या मधल्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. मी नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणासाठी कधीच हातभार लावलेला नाही. आपल्या देशात लोकशाही असून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला कलाकार म्हणून मांडायची असेल तर त्याने स्पष्टपणे मांडावी. यामध्ये कोणत्याही स्वरपामध्ये भूमिका नाकारण्याचं आणि लपविण्याचं काही एक कारण नाही, असं मला वाटतं. देशाचा सजग नागरिक म्हणून मला विचार माडंण्याचं आणि विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र आपण अनेकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या माडंणीमध्ये गल्लत करतो. मात्र आपण अशाप्रकारची गल्लत आपण कदापि करु नये,'' असे मला वाटते.

Why I Killed Gandhi चा प्रोमो

''मी महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) हत्या केली. मी त्या कार्यक्रमाची स्वातंत्र्यवीर सावरकरांना जराशीही कल्पना नव्हती. अमानुषपणे झालेल्या भारताच्या विभाजनामध्ये दीड कोटीपेक्षा अधिक लोक बेघर झाले आणि लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला,'' असं वाक्य खासदार कोल्हे चित्रपटाच्या टीझरमध्ये बोलताना दिसून येत आहेत. ''नव्याने बनलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती नामशेष करण्यासाठी जे हिंदूवर अत्याचार केले जात आहेत त्याचं मूळ कारण हे महात्मा गांधी हे आहेत,'' असही कोल्हे या चित्रपटामध्ये म्हणताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com