मराठा आरक्षण हा समतेचा लढा!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कोल्हापूरमध्ये सकल मराठा कोल्हापूरतर्फे आयोजित दसरा मराठा मेळाव्यात खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती बोलत होते. 

कोल्हापूर-  मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत. लोकप्रतिनिधींनी त्यांचे कार्यक्रम बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन करत आरक्षण हा समतेचा लढा असून, तो न्यायालयीन लढाईच्या जोरावर जिंकावा लागेल, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. सकल मराठा कोल्हापूरतर्फे आयोजित दसरा मराठा मेळाव्यात ते बोलत होते. 

  संभाजीराजे म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला १९०२ ला आरक्षण दिले होते. त्यात मराठा समाजाचा देखील समावेश होता. महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या मोठी असून, ८५ टक्के मराठा समाज गरिबीशी झुंज देत आहे. 
 

संबंधित बातम्या