विद्यार्थ्यांच्या लढ्यानंतर MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार

The MPSC pre examination will now be held on March 21
The MPSC pre examination will now be held on March 21

मुंबई :  परीक्षा स्थगित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना  परीक्षेची तारीख उद्या जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. आता ही परीक्षा 21 मार्चला होणार आहे. एमपीएससीने आज जारी केलेल्या नोटीसनुसार एमपीएससी अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा 27 मार्च रोजी, तर महाराष्ट्र ग्रुप बी कम्बाइंड प्रिलिम्सची परीक्षा 11 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षा स्थगित झाल्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक परीक्षेची तारीख उद्या जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. MPSC परीक्षा पुढे ढकलल्याच्या निर्णयावर सत्ताधारी आघाडीचे सदस्य कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती. 

राज्य सरकारने प्राथमिक परीक्षा पुढे ढकलल्याच्या अधिसूचनेचा निषेध करण्यासाठी हजारो विद्यार्थी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरले आणि पोलिसांना काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला. MPSC 2020 ची पूर्वपरीक्षा 14 मार्चला घेण्यात येणार होती, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. कोरोनामुळे ही परीक्षा तब्बल 5 वेळा पुढे ढकलण्यात आल्याने काल विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com