मुंबईत सुमारे 798 कंटेन्मेंट झोन

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

4538 इमारती सील; परिसरात 10 हजार कोरोनाबाधित

मुंबई

कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणाऱ्या परिसराला महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात येत असून आतापर्यंत मुंबईत 789 कंटेन्मेंट झोन आहेत. या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये सुमारे 19 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत; तर संपूर्ण मुंबईत आजपर्यंत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या चार हजार 538 इमारती सील करण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींमध्ये एकूण सुमारे दहा हजार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दहिसर या आर-उत्तर विभागात 116, तर कुर्ला एल विभागात 115 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. सर्वाधिक कमी प्रतिबंधित क्षेत्र ग्रॅंट रोड, मलबार हिल या डी - विभागात आहेत. या विभागात 9 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. मात्र माहीम आणि वरळी या विभागात 12 व 11 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या दोन्ही विभागांमध्ये कमी प्रतिबंधित क्षेत्र असली तरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1400 व 1021 एवढे आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये आलेल्या 4538 इमारतींमध्ये एकूण ????????? लाख 80 हजार 187 घरे आहेत. 8 लाख 2 हजार 730 लोकसंख्या असलेल्या या सर्व इमारतींमध्ये 9 हजार 956 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

वडाळ्यात सर्वाधिक इमारती सील
वडाळा, शीव, अँटॉपहिल या एफ उत्तर विभागात 443 इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतींमधून 713 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बोरिवलीच्या आर-मध्य विभागात 373 इमारती सील केल्या. मालाड पी-उत्तर विभागात 306 इमारती आणि माहीम-धारावी व दादर या जी-उत्तर विभाग, तसेच विलेपार्ले व जोगेश्‍वरी पूर्व या के-पूर्व विभागात प्रत्येकी 265 इमारती सील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

संबंधित बातम्या