मुंबई गोवा महामार्ग बंदच

Avit Bagle
शुक्रवार, 10 जुलै 2020

मुंबई गोवा महामार्गावर काल रात्री ही दरड कोसळली होती. अत्यावश्यक सेवा देणारी वाहनेही अडकून पडली आहेत.

पणजी

पोलादपूर येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने मुंबई गोवा वाहतूक काल रात्री बंद पडली होती ती अद्याप बंदच आहे. दरड हटवण्याचे काम अद्यापही सुरु आहे. जवळजवळ २४ तास होत आले तरी दरड हटवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. जोरदारपणे पडत असलेल्या पावसामुळे दरडीचा वरचा भाग आता रस्त्यावर पडू लागला आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरु करता येत नाही अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शनी दिली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर काल रात्री ही दरड कोसळली होती. अत्यावश्यक सेवा देणारी वाहनेही अडकून पडली आहेत. वाहनांच्या मोठ्या रांगा दोन्ही बाजूने लागल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि काळोख यामुळे काल रात्री दरड हटवण्याच्या कामाला गती मिळाली नव्हती. आज सकाळी युद्धपातळीवर हे काम हाती घेण्यात आले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ही दरज पूर्णतः हटवण्यात यश आले नव्हते.

रात्री ८ वाजेपर्यंत रस्ता खुला झाला तर अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने आधी सोडली जाणार आहेत. त्यानंतर इतर वाहनांना वाट करून दिली जाणार आहे. पाऊस कोसळत असल्यामुळे दरड पून्हा कोसळू नये यासाठी वाहतूक सुरु करतानाही अंदाज घेऊनच ती सुरु केली जाणार आहे.

 

संबंधित बातम्या